Share

आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाही मुंबईचा ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील यशानंतर भारतीय खेळाडू देशातील लोकप्रिय असलेल्या आयपीएलसाठी सज्ज झालेत. येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. यंदाची आयपील ट्रॉफी जिंकुन मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये हॅटट्रीक साधण्याच्या दृष्टीने उतरणार आहे आणि कर्णधार रोहित शर्माही यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.

यावर्षीचा आयपीएलचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  यांच्यात होणार आहे. या मोसमातही मुंबईची टीम भक्कम असून पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यासाठीची प्रबळ दावेदार आहे.

मात्र, मुंबई इंडियन्सचा महत्वाचा खेळाडू क्विंटन डिकॉकला पहिल्या सामन्यामध्ये खेळणार नाही, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये डिकॉक मैदानात उतरला होता, त्यामुळे त्याला 7 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. त्यामुळे आता क्विंटन डिकॉकच्या जागी कोणाला खेळणार हे अद्यापही समोर आले नाही.

मुंबईचा संघ : 

(कॅप्टन) रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, धवल कुलकर्णी, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरान पोलार्ड, कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ट्रेन्ट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, एडम मिल्ने, नॅथन कुल्टर नाइल, पियुष चावला, मार्को जेन्सन, युद्धवीर सिंग, जेम्स नीशम, अर्जुन तेंदुलकर, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!