Share

‘सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता दिल्यास फिक्सिंगला प्रोत्साहन मिळेल’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : मॅच फिक्सिंगच्या मुद्द्यावरून नेहमी मोठे वाद निर्माण होत असतात. भारतीय क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची मोठी समस्या असल्याचे वारंवार समोर आलं आहे. दरम्यान याच समस्येला दूर करण्यासाठी आता मॅच फिक्सिंगशी संबंधित नियम करण्यात यावेत, तसेच क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्यात यावी अशी मागणी केली जात होती.

मात्र, भारतात सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता दिल्यास फिक्सिंगला प्रोत्साहन मिळेल, असे मत भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) भ्रष्टाचार विरोधी पथकाचे नवे प्रमुख शब्बीर हुसेन शेखदम खंडवावाला यांनी व्यक्त केलं आहे.

लहानात लहान लीगमधून संशयास्पद हालचालींचे समूळ उच्चाटन करणे हे आपल्यापुढील मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सोमवारी सांगितले. क्रिकेटमध्ये सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता दिल्यास यातून मोठा महसूल मिळू शकतो, असा मानणारा एक मतप्रवाह आहे. मात्र, एसीयूच्या नव्या अध्यक्षांचे याविरुद्ध मत आहे. सट्टेबाजीला मान्यता द्यायची की नाही हा वेगळा मुद्दा आहे. मात्र, मी एक पोलीस अधिकारी या नात्याने सट्टेबाजीमुळे क्रिकेट या खेळाची पार वाट वाटेल असे मला वाटते.

त्यामुळे आतापर्यंत सट्टेबाजीला परवानगी मिळाली नाही ते योग्यच झाले, असेही ते म्हणाले. क्रिकेटमध्ये सट्टेबाजीला थारा असता कामा नये. उलट याबद्दलचे नियम अधिक कडक करायला हवेत. मी नक्कीच या गोष्टीवर काम करणार आहे. असेही ते पुढे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!