Share

‘खराब कामगिरी करीत असताना देखील नेट्‌समध्ये फलंदाजी सरावास नकार’

Published On: 

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 14 वे सत्र 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. टूर्नामेंटचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात असणार आहे. आयपीएल सामन्यांसाठी संघ जोरदार मेहनत घेताना दिसत आहेत. सगळेच खेळाडू उत्कृष्ठ कामगिरी करण्यासाठी नेट्समध्ये घाम गळताना दिसतात. पण सातत्याने अपयशी ठरलेला पृथ्वी शॉ मात्र नेट्समध्ये सराव करत नाही याचा खुलासा  दिल्ली कॅपिटल्सचे कोच रिकी पाँटिंग यांनी केला आहे.

मागील आयपीएलमध्ये पृथ्वी शॉ सातत्याने अपयशी ठरत होता. पण तो नेट्‌समध्ये फलंदाजीसाठी सरावाला देखील येत नसे, असा खुलासा दिल्ली कॅपिटल्सचे कोच रिकी पाँटिंग यांनी केला. या प्रतिभावान फलंदाजाला आयपीएल सुरू होण्याआधी सरावातील सवयी सुधाराव्या लागतील, यावर कोचने भर दिला आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे संघातून बाहेर पडलेल्या पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफीत जोरदार कामगीरी केली आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीत पुन्हा एकदा धडाकेबाज शतकी खेळी करत सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखली. त्यामुळे पृथ्वी शॉ कडून आता सगळ्यांनाच अपेक्षा आहेत. या आयपीएलमध्ये पुथ्वी शॉच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!