Share

‘कोरोना बाधित खेळाडू लवकरच संघात परततील’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. यातच येत्या 9 एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगचे 14 वे सीजन सुरु होणार आहे. मात्र IPL सुरु होण्यापूर्वीच या सामन्यावर कोरोनाचे सावट पडले आहे.

आयपीएल 2021 सुरू होण्यास अजून काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. दरम्यान,आयपीएल सुरु होण्याआधी दिल्ली कॅपिटल्ससह चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला मोठा धक्का बसला होता. दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्टार अष्टपैलू अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली होती. तर चेन्नई सुपर किंग्स संघातील स्टाफ मेंबर हे कोरोना संसर्गग्रस्त आढळले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचा ओपनर देवदत्त पडिक्कल याला देखील कोरोनाची लागण झाली होती.

या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असून हे खेळाडू आयपीएल सामने खेळणार की नाही याबाबत शंका घेतली जात आहे. मात्र, हे सर्व खेळाडू करोनातून मुक्‍त होऊन विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करुन लवकरच संघात परततील असा विश्‍वास बीसीसीआयने व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!