मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२१ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर आयपीएलचे भारतात पुनरागमन होत आहे. ९ एप्रिलला पहिला सामना तर अंतिम सामना हा ३० मे रोजी होणार आहे. मात्र, यंदाही स्पर्धा विनाप्रेक्षकच पार पडणार आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरला. इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वासाठी चेन्नई सुपर किंग्सच्या सराव सत्राची सुरूवात झाली. त्यात धोनीला सराव करताना पाहून चाहते सुखावले आहेत आणि त्यामुळेच सोशल मीडियावर #DhoniReturns हा ट्रेंड सुरू झाला आहे.
https://www.instagram.com/p/CNRazeGgzSa/?utm_source=ig_web_copy_link
नुकताच चेन्नई संघाने इस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी चांगलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. धोनीने असा काही शॉट मारला की या शॉटची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार चालू आहे. धोनीने जरी क्रिकेटमधून सन्यास घेतला तरी देखील धोनीचे लाखोंनी चाहते आहेत. या व्हिडीओमध्ये धोनीने एका हाताने षटकार मारला आहे. एका हाताने षटकार मारणाऱ्या धोनीचा हा व्हिडीओ त्याच्या फॅन्सना फारच आवडला आहे. धोनीच्या व्हिडिओला भरभरून लाईक्स आणि कंमेंट्स देखील मिळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता दिल्यास फिक्सिंगला प्रोत्साहन मिळेल’
- ‘कोरोना बाधित खेळाडू लवकरच संघात परततील’
- ‘बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी ; खेळाडूंसाठी बायो-बबल तयार’
- ‘खराब कामगिरी करीत असताना देखील नेट्समध्ये फलंदाजी सरावास नकार’
- ‘ब्रेक द चेन’ या गोंडस नावाखाली बाजारपेठा बंद


