Share

मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार; रेल्वे पोलिसांना धमकीचा फोन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईत रेल्वे पोलिसांना एक धमकीचा फोन आला आणि या फोनने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. एका निनावी फोन कॉलच्या माध्यमातू मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी देण्यात आली असल्याचं रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस यंत्रणेची टीम बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडसोबत स्टेशन परिसरात दाखल झाली आणि त्यांच्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं आहे.

सर्च ऑपरेशन सुरु असून या दरम्यान पोलिसांना कोणतीही संशयित वस्तू याठिकाणी आढळून आली नाही. मुंबई लोकलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. निनावी फोननंतर लोकल स्थानकावर देखील जीआरपी आणि मुंबई पोलिसांची टीम तैनात करण्यात आली होती. स्थानकांवर येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. शनिवारी बांद्रा जीआरपी पोलिसांना आज संध्याकाळी 6:25 दरम्यान फोन वरून निनावी फोन आला होता. ज्याच्यानंतर मुंबई पोलीस, जीआरपी, डॉग स्कॉड आणि बॉम्ब स्कॉडकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं असून ते सुरू आहे.

शनिवारी संध्याकाळी रेल्वे विभागाला निनावी फोन आला होता. या फोनवरुन एका व्यक्तीनं पोलिसांना मुंबई लोकल बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली. जावेद नावाचा इसम मुंबई मध्ये बॉम्ब ब्लास्ट करणार असल्याची माहिती बांद्रा जीआरपी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच जी आर पी ने सर्व सुरक्षा यंत्रणांना दिली माहिती. मुंबई लोकलची सुरक्षा वाढवण्यात आली असून सर्व यंत्रणा हायअलर्टवर आहे. मात्र हा कॉल कुठून आला याची चौकशी मुंबई पोलीस करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!