Share

पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू पण लता मंगेशकर यांच्या निधनाने व्यथित

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज मुंबई शहरातील ब्रीच कँडी रुग्णालयात न्यूमोनियामुळे निधन झाले, त्या ९३ वर्षाच्या होत्या. लता मंगेशकर यांनी त्यांच्या आवाजाने फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील संगीत रसिकांना भुरळ घातली होती याचाच प्रत्यय आज आला. लता मंगेशकर यांच्या निधनाने पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंना पण दुःख झाले आहे.

त्यांनी सामाजिक माध्यमांद्वारे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार वकार युनूस आणि पाकिस्तान क्रिकट बोर्डचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी लता मंगेशकर यांना सामाजिक माध्यमांद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. दिग्गज गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीताच्या एका युगाचा अंत झाला असून त्यांचा प्रत्येक चाहता आज दु:खात आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने ट्विट करीत लिहले आहे कि, ” सुवर्ण युगाचा शेवट. लताजींचा जादुई आवाज, त्यांचा वारसा लाखो लोकांच्या हृदयात जिवंत राहील. एक अनोख्या आयकॉन.” तर पीसीबी प्रमुख रमीझ राजा यांनी म्हंटले आहे कि, ” लता मंगेशकर या साधेपणाच्या, नम्रतेच्या आणि कृपेच्या प्रतीक होत्या आणि म्हणूनच त्या महान होत्या. आपल्या सर्वांसाठी हा एक धडा आहे. किशोर कुमार आणि आता लता मंगेशकर यांच्या निधनानंतर माझे संगीत संपले आहे.”

तर पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि जलदगती गोलंदाज वकार युनिस याने पण ट्विट करीत श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने, ” आपल्याला लता मंगेशकर यांच्या जाण्याने तीव्र दुःख झाले असून पुन्हा एक लता मंगेशकर निर्माण होणे केवळ अशक्य आहे” असे म्हंटले आहे.

      महत्वाच्या बातम्या:  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!