मुंबई: स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आवाज कायमचाच हरपला आहे. आज (६ फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी (Lata Mangeshkar dies at 92) त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांचे निधन झाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत अशा सूचना देखील उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, लता मंगेशकर यांची अंत्ययात्रा शिवाजी पार्ककडे रवाना झाली आहे. सुरुवातीला लता मंगेशकर यांचं निवासस्थान प्रभूकुंजबाहेर त्यांना मानवंदना देण्यात आली. शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला पंतप्रधान मोदींपासून (PM Narendra Modi) अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. याशिवाय लाखोंच्या संख्येत सर्वसामान्य नागरिक देखील हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; राज्यात सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर
नातवंडांना सांगू “आम्ही लतादीदी नावाच्या सरस्वतीच्या अवताराला प्रत्यक्ष पाहिलं”-सलील कुलकर्णी
‘उद्धव ठाकरेंवर हत्येचा गुन्हा दाखल करणार’; किरीट सोमय्यांचा इशारा
शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली; औरंगाबादेत सत्तार-भुमरे यांच्यात वादाची ठिणगी..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

