मुंबई: स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आवाज कायमचाच हरपला आहे. आज (६ फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी (Lata Mangeshkar dies at 92) त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांचे निधन झाले.
लता मंगेशकर अत्यंत शांत स्वभावाच्या होत्या हे तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र त्या एकदा भडकल्या सुद्धा होत्या हे फार कमी लोकांना माहीत असणार. रॉयल्टीच्या मुद्द्यावरुन मोहम्मद रफी आणि लतादीदी यांच्यात चांगलेच वाद झाले होते. मोहम्मद रफी मागे हटायला तयार नव्हते तसेच लतादीदी सुद्धा आपल्या मुद्द्यावर ठाम होत्या. त्यावेळी रॉयल्टीच्या मुद्द्यावरून एक बैठक झाली होती. या बैठकीत दोघांचे वाद झाले होते.
‘मोहम्मद रफी : माय अब्बा’ या पुस्तकात या प्रसंगाचा उल्लेख आहे. मोहम्मद रफी (Mohammad Rafi and Lata Mangeshkar) यांची सून यास्मिन खालिद यांनी लिहिलेल्या या पुस्तकात म्हटलंय, रॉयल्टीचा मुद्दा लता मंगेशकर यांनी निर्मात्यांसमोर मांडला होता, लताजींना आशा होती की या लढ्यात रफी त्यांना साथ देतील, मात्र तसं झालं नाही. मोहम्मद रफी यांचे मत या बाबतीत लता मंगेशकर यांच्यापेक्षा वेगळे होते. रफी साहेब म्हणाले की, जेव्हा गायकांना त्यांची फी मिळत असते, मग ते कशासाठी रॉयल्टी मागत असतात, त्यात गायकांचा काहीही अधिकार नाही.
बैठकीत वाद विकोपाला गेला आणि मोहम्मद रफी त्या बैठकीत अचानक उभे राहिले आणि म्हणाले, आजपासून मी लतादीदींसोबत गाणार नाही. हे ऐकून लता मंगेशकर यांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाल्या, तुम्ही काय मीच तुमच्यासोबत गाणार नाही. याबद्दलचा किस्सा लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत देखील सांगितला होता. या प्रसंगानंतर काही वर्षांनी मोहम्मद रफी यांनी पत्रातून लता मंगेशकर यांची माफी मागीतल्याचे सांगितले जाते आणि पुन्हा दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली होती.
महत्वाच्या बातम्या:
औरंगाबाद येथील बिडकीनला मिळाले ‘ऑक्सिजन’ प्लान्ट; जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले उद्घाटन!
‘घरकुल नाही फेककुल’, ‘सपनो का घर सपने में ही मिलेगा’; औरंगाबादेत भाजपविरोधात एमआयएमची बॅनरबाजी!
माननीय सुप्रीम कोर्टकडून पुन्हा ‘लोन मोराटोरिअम’चा निर्णय ??
लता मंगेशकरांची अंत्ययात्रा शिवाजी पार्ककडे रवाना; लाखोंची गर्दी होण्याची शक्यता


