Share

अर्णब गोस्वामींसह त्यांच्या पत्नीवर मुंबई पोलिसांकडून खटला दाखल

Published On: 

मुंबई : मुंबई पोलिसांच्या वतीनं पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीने मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केल्याचे या याचिकेत म्हटलं आहे. तसेच मुंबई पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनीही अर्णब गोस्वामी आणि कुटुंबियांविरोधात अब्रुनुकसानीचा वैयक्तिक दावा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९, कलम ५००आणि कलम ५०१अंतर्गत पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी मुंबई सत्र न्यायालयात हा दावा दाखल केला आहे.

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीविरोधात मुंबई पोलिसांनी बदनामीचा खटला दाखल केला आहे. मुंबई सत्र न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी ते टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेले होते. तसेच देशाच्या सुरक्षेसंबंधी गुप्त माहिती पसरवली असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर केला गेला होता. गोस्वामी यांच्या विरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली होती. आणि आता त्यांच्यावर मुंबई पोलिसांच्या वतीनं तक्रार दाखल केली गेली आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!