Share

मुंबई महापालिकेचा कोरोना लस घोटाळा ; किरीट सोमय्यांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये देखील महाराष्ट्रातील राजकारण काही केल्याने थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढलं. यामध्ये निविदा भरण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. यात सुरुवातीला फक्त 3 टेंडर आले होते. पण शेवटच्या एका तासात 5 टेंडर आले. हे 5 टेंडर बनावट असल्याचा दावा करत, मुंबई महापालिकेचा हा कोरोना लस घोटाळा असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेलं काढलेल्या ग्लोबल टेंडरची मुदत काल संपली आहे. त्यात सुरुवातीला फक्त 3 टेंडर आले होते. पण शेवटच्या एका तासांत 5 टेंडर आहे. हे 5 टेंडर बनावट आहेत. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कागदपत्रे देण्यात आली नाहीत. तसंच कागदपत्र देण्यासाठी मुंबई महापालिकेकडून 8 दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय. त्याचबरोबर गेल्या महिन्यात मुंबई महानगरपालिका आणि ठाकरे सरकारनं रेमडेसिव्हीर घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

महापालिकेनं रेमडेसिव्हीरसाठी प्रत्येकी 1 हजार 568 रुपयांची ऑर्डर काढली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्ष असलेल्या हाफकीनने 668 रुपयांची ऑर्डर काढली. त्यामुळे मुंबई महापालिकेत आता रेमडेसिव्हीर पाठोपाठ कोरोना लस घोटाळा होत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या या सर्व आरोपांना आता शिवसेना नेमेके कसे उत्तर देणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!