पुणे : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं होतं. मात्र, गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ जूननंतर सरसकट लॉकडाऊन उठणार नाही, असं भाष्य केलं होतं. दरम्यान, राजेश टोपे हे आज पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी राज्यातील लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढणार, असं सूतोवाच केलं आहे.
राज्यात आणखी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू आहे. राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, असं राजेश टोपे म्हणाले आहेत. यामुळे राज्यातील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढेल मात्र काहीही शिथिलता देण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२१ जिल्ह्यांमध्ये राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेट पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रेट – टोपे
‘२१ जिल्ह्यांमध्ये राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेट पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रेट आहे. त्यामुळे पूर्णपणे लॉकडाऊन हटवता येणार नाही. लॉकडाऊन हा वाढवण्यात येणार असून काही बाबतीत शिथिलता देण्याबाबत चर्चा झाली. मात्र, कोणकोणत्या गोष्टींना सूट द्यायची यावर मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा होऊ शकत नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात याबाबत नियमावली तयार केली जाईल. तर सूट असलेल्या वेळेत काही प्रमाणात वाढ करण्यात येऊ शकते, असं भाष्य राजेश टोपे यांनी गुरुवारी केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- ‘कोरोना काळात अपयशी ठरलेल्या मोदींना माफी मागण्यासाठी सावरकर जयंतीसारखा उत्तम मुहूर्त नाही’
- दिलासादायक! तब्बल ३ महिन्यांनी जालन्यात रुग्णसंख्या शंभरच्या आत
- ‘कोरोनामहामारीतही स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत, लोकांचे खुन होताहेत, तिथे दाखवा खाकीचा ज़ोर’
- ‘पोलिसांनी या मोर्चाला आडकाठी न करता सहकार्य करावे’ – आ. मेटे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

