Share

लसीसाठी काढलेले ग्लोबल टेंडर मुंबई महापालिकेने केले रद्द

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला होता. कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई महापालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढलं होते. या टेंडरद्वारे १ कोटी डोसची मागणी करण्यात आली होती.

यासाठी देश-विदेशातील ९ कंपन्यांनी सहभाग देखील घेतला होता. परंतु आता सहभागी सर्व नऊ पुरवठादार अपुऱ्या कागदपत्रांअभावी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावरील कंपन्यांकडून लस मिळविण्याचे पालिकेचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. यामुळे आता महापालिकेने ग्लोबल टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी स्पुटनिक या रशियाच्या लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुटनिक लसींचा साठा महानगरपालिकेला देण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!