Share

तिघाडीच्या ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती… विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा! – आशिष शेलार

Published On: 

मुंबई – कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. तसेच आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले

आरेतील कारशेड हलवण्याचे उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्यानंतर भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडले होते. आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट.. करोडो रुपये वाया जाणार, नवीन परवानग्या कधी मिळतील व मिळतील की नाही माहीत नाही कारण ती जमीन भुसभुशीत (खारफुटी सारखी) आहे. किमान ५ हजार कोटी या नवीन उभारणीसाठी लागणार… आधीचे पैसे गेले,’ अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली होती.

आता, कांजूर येथील प्रस्तावित कारशेडसाठी घोषणा करण्यात आलेली जमीन देखील नव्या वादात सापडली आहे. ‘मेट्रो कारशेड हलवण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यामुळे मुंबईकरांना त्रास होत असल्याचे आम्ही सांगितलं होतं. मिठागार आयुक्तांची परवानगी जागा नावावर करताना घेतली होती का असा सवाल आधी देखील केला होता.आज केंद्राच्या पत्राने स्पष्ट झालं आहे, अहंकाराच्या भावनेतून घेतलेल्या निर्णयाचे मुंबईकरांना दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत.’ अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

तर, ‘ मेट्रोच्या प्रकल्पामध्ये  महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती आहे. विकास प्रकल्प लटकवणे, त्यानंतर अडकवणे म्हणजे जागा नावावर करताना ज्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं होत ते केलेलं नाही. आणि मग जनतेला चुकीची माहिती देऊन भटकवणे असा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे’ असा घणाघातच शेलारांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!