Share

मुंबई लोकल : राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर रेल्वेमंत्री गोयल यांनी घेतला महत्वाचा निर्णय !

Published On: 

मुंबई : 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं, राज्य सरकारनं सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्य माणसांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे.

राज्य सरकारने लोकल सुरु करण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालय त्याला काय प्रतिसाद देणार याकडे मुंबईकरांचं लक्ष्य लागलं होतं. रेल्वे मंत्रालयाने देखील राज्य सरकारच्या या निर्णयाला हिरवा कंदील दिला आहे. या संदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

‘माझ्या प्रिय मुंबईकरांनो, आपल्या सुविधेसाठी 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल ट्रेन सर्वसामान्य लोकांसाठी लोकल सेवा दिवसाची पहली ट्रेन सुरु झाल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत आणि त्यानंतर रात्री 9 वाजेपासून शेवटच्या लोकलपर्यंत सुरु करण्यात आली आहे,’ असं पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार सकाळी 7 ते 12, तसेच सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई लोकल ट्रेन केवळ आवश्यक सेवामधील कर्मचाऱ्यांसाठीच चालवल्या जाणार आहेत. या वेळेत सामान्य लोकांसाठी लोकल प्रवासाची परवानगी नसेल. आपल्याला आवाहन आहे की प्रवासादरम्यान आपण कोरोनासंबंधील सर्व नियमांचं पालन करावं,’ असं आवाहन देखील त्यांनी मुंबईकरांना केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!