Share

आयपीएलची टशन : क्रिस लिनच्या धडाकेबाज खेळीने मुंबई इंडियन्सची स्थिती भक्कम !

Published On: 

चेन्नई : आजपासून आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएलची टशन यंदा भारतातच रंगणार असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये आयपीएलचा आनंद घेता येणार नाही. दरम्यान, यंदाच्या पर्वाचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूचा गतविजेत्या मुंबई इंडियन्सशी होत आहे.

चेन्नईमधील चेपॉक स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जात असून नाणेफेक जिंकून आरसीबीने पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या सलामीवीर रोहित शर्माला व क्रिस लिनला सुरुवातीला आरसीबीच्या फिरकीपटूंनी त्रस्त केले. मात्र, रोहितने नंतर आक्रमक भूमिका घेतली आणि चौके, छक्के लगावले. मात्र, धाव घेताना लिन व शर्मा मधला समन्वय चुकला आणि युजवेंद्र चहलने रोहितला धावबाद केले.

यानंतर, क्रिस लिनने आपली जबाबदारी शानदार पद्धतीने पार पाडली आहे. गेल्या सत्रापासून मुंबई इंडियन्ससोबत असून देखील क्रिस लिन मुंबईसाठी आजच पहिल्यांदा सामन्यात खेळण्यासाठी उतरला. यावेळी त्याने सुरुवातीला काहीसा वेळ घेतल्यानंतर आक्रमक खेळी केली. अवघ्या एक धावेने त्याचे अर्धशतक हुकले असले तरी त्याच्या खेळीने मुंबईची स्थिती भक्कम झाली आहे. ३५ चेंडूंमध्ये ३ छक्के व चार चौके लगावत त्याने ४९ धावांची खेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!