🕒 1 min read
बीड : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीन स्फोटकांच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर, स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृतदेह हदलून आला होता. यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले होते. दरम्यान, या प्रकरणी सचिन वाझे याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. सबळ पुराव्यांनिशी त्यांना एनआयएने अटक केली होती. यानंतर सचिन वाझेने देखील लेटरबॉम्ब टाकले असून शिवसेना नेते व मंत्री अनिल परब यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.
तर दुसरीकडे, देशाच्या सामर्थ्यात मोठी भर घालणाऱ्या राफेल विमान खरेदीमध्ये केंद्र सरकारने मोठा घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हे दोन्ही प्रकरण सुरु असतानाच महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक होत आहे. या तिन्ही प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य करत टोला लगावला आहे.
‘देशात राफेल आणि राज्यात सचिन वाझे प्रकरण आहे, त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच कोरोना आहे का असा प्रश्न पडतोय,’ अशी मिश्किल टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यापाऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी आजची मुदत दिली होती. मात्र अजूनपर्यंत त्यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही अथवा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपले शटर उघडे ठेवून व्यवहार सुरु ठेवावेत. सरकारची आर्थिक परिस्थिती खालावली असेल, तर आम्ही मदत करू. पण व्यापाऱ्यांना व्यवहार करु द्या, असं भाष्य देखील आंबेडकरांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- अजितदादांच बोलणं टग्यासारखं पण रडणं बाईसारखं : गोपीचंद पडळकर
- वीकेंड लॉकडाऊन : पुण्यात काय काय सुरु ? महापौर मुरलीधर मोहोळ यांची महत्वाची माहिती
- …तरच सरसकट लॉकडाऊनला भाजप सकारात्मक प्रतिसाद देईल – दरेकर
- आता दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय ? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची महत्वाची माहिती
- ‘गोड बोलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमची वाट लावली!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
