Share

शरद पवारांना घरी जाऊन कोरोना लस; हायकोर्टाने ठाकरे सरकारला झापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या घरी कोरोनाची लस देण्यात आली होती. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतात. तर मग महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना त्यांच्या घरी कोरोनाची लस कशी काय? महाराष्ट्रातील नेते काही वेगळे आहेत का? असा प्रश्न हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. यावेळी कोर्टाने कोणाच्याच नावाचा उल्लेख केला नाही. पण, यापुढे असे घडल्यास कारवाईचा इशारा न्यायालयाने सरकारला दिला.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्ती, विकलांग व दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरी जाऊन लस द्यावी, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली. यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती.

यावेळी केंद्राच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, घरोघरी जाऊन लस देण्याची सुविधा अद्याप उपलब्ध करण्यात आली नाही. यावर कोर्टाने आक्षेप घेतला. जर घरोघरी जाऊन लस देण्यासंदर्भात धोरण अस्तित्वात नाही. तर मग महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना त्यांच्या घरी जाऊन लस कशी देण्यात येते? राज्यतील नेत्यांना त्यांच्या घरी बसून लस मिळते आहे. घरोघरी जाऊन लस देणे , हे तुमच्या धोरणात बसत नसेल तर राजकारण्यांसाठी तुमचे धोरण वेगळे कसे? सर्वांसाठी एकसमान धोरण असायला हवे, असे मत कोर्टाने नोंदविले.

‘देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान लस घेण्यासाठी लसीकरण केंद्र किंवा रुग्णालयात गेले. महाराष्ट्रातील राजकीय नेते त्यांच्याहून वेगळे नाहीत. अशामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. भविष्यात पुन्हा अशी घटना घडली तर कारवाई करू. जर एखाद्या राजकीय नेत्याला घरी बसून लस मिळाली, अशी घटना आमच्या निदर्शनास आली तर कडक कारवाई करू,’ असेही हायकोर्टाने ठाकरे सरकारला इशारा दिला.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!