Share

वीकेंड लॉकडाऊन : पुण्यात काय काय सुरु ? महापौर मुरलीधर मोहोळ यांची महत्वाची माहिती

Published On: 

पुणे : राज्यात कोरोना रोगाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून आरोग्य यंत्रणा देखील अपुऱ्या पडत आहेत. दरम्यान, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच, शनिवार-रविवार या दोन दिवशी वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे शहरात देखील कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असून गुरुवारी रेकॉर्डब्रेक ७ हजार १० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे शहरात या वीकेंड लॉकडाऊनमध्ये कोणकोणत्या सेवांना सूट देण्यात येणार आहे याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

काय काय सुरु असेल ?

१)मेडिकल दुकानांना वेळेचं बंधन नाही.

२)शनिवारी आणि रविवारी सकाळी ६ ते सकाळी ११ या वेळेत दूध विक्री करण्यास परवानगी

३)सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा पुरवठा करणारे कंपनी (ई-कॉमर्स, स्विगी, झोमॅटो इ.) यांना आठवड्यातील सर्व दिवस प्रवास करण्यास परवानगी राहील.

४)शुक्रवारी सायं ६ ते सोमवारी स. ७ या संचारबंदी काळात नागरिकांना हॉटेलमध्ये जाऊन पार्सल घेण्यास प्रतिबंध राहील. मात्र घरपोच पार्सल सेवा सुरू राहील.

५)पुणे महानगरपालिका क्षेत्रात घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस/नर्स यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०७:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत प्रवास करण्यास परवानगी राहील.

६)कोरोना लसीकरण केंद्रावर जाण्यास आठवड्यातील कोणत्याही दिवशी प्रतिबंध नसेल. ही सुविधा आठवड्यातील सर्व दिवस सुरूच राहतील.

अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!