मुंबई : पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ आता पूर्णणे आयपीएल २०२२ (IPL 2022 ) स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामातील आपली स्पर्धा संपवली. या हंगामात रोहित शर्माच्या मुंबई संघाची कामगिरी अत्यंत खराब होती आणि त्यामुळेच त्यांना प्रथम स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. आता ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकत नाहीत.
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत १० सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त २ सामने जिंकले आहेत आणि ८ गमावले आहेत. आता उरलेले चार सामने जरी त्याने जिंकले तरी केवळ १२ गुण गाठता येतील. इतर संघ त्यांच्यापेक्षा खूप पुढे जातील.
मुंबई इंडियन्सचा संघ सुरुवातीपासूनच लयीत दिसला नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांना फलंदाजीत कमाल दाखवता आली नाही. तर जसप्रीत बुमराह गोलंदाजीत फ्लॉप ठरला आणि या कारणास्तव हा हंगाम संघासाठी खूपच निराशाजनक होता.
Mumbai Indians become the first team to knock-out from #IPL2022.
— Johns. (@CricCrazyJohns) May 4, 2022
आयपीएल २०२२ मध्ये, लखनऊ सुपर जायंट्सचा संघ ११ सामन्यांमध्ये ८ विजयांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर गुजरात जायंट्सचा संघ तितक्याच सामन्यांत ८ विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचा नेट रन रेट लखनऊपेक्षा कमी आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ ७ विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ ११ सामन्यांत ६ विजयांसह चौथ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

