Share

मुंबई इंडियन्स : २०२० च्या IPL मधील एक परिपूर्ण संघ….

Published On: 

दिग्विजय दीक्षित, पुणे : IPL च्या मध्यंतराजवळ असताना पूर्वार्धात प्रत्येक संघाने ७ सामने खेळून झालेले आहेत आणि आता आपला प्रवास हळूहळू उत्तरार्धाकडे सुरू झालेला आहे. या शृंखलेची सुरवात झाली ती एकमेकांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी मुंबई आणि चेन्नई यांच्या दरम्यान झालेल्या सामन्याने. मुंबई इंडियन्स संघाचा एकूणच इतिहास पाहता २०१२ नंतरच्या कोणत्याही IPL हा संघ पहिला सामना कधीही जिंकलेला नाही आणि यावर्षीही तेच अपेक्षित घडले. याचे कारण म्हणजे हा संघाला त्यांचा ११ जणांचा सामन्यात खेळणारे संयोजन ठरावण्यास सुरवातीचे काही सामने लागतात.

दुसऱ्या सामन्यात रोहित आणि सुर्यकुमारच्या कामगिरीच्या बळावर संघाने १९५ धावांची मजल तर मारली पण ४ नंबरला खेळणाऱ्या सौरभ तिवारीची जागा दुसऱ्या सामन्यानंतर नक्कीच धोक्यात आलेली होती. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात निवडकर्त्यांना अपेक्षित कामगिरी न केल्याने तसेच क्षेत्ररक्षणात झेल सोडल्याने त्याच्या ऐवजी संघात डावखुऱ्या ईशान किशनला जागा मिळाली.

त्यानंतरच्या बँगलोर विरुद्धच्या सामन्यात पहिली फळी बाद स्वस्तात झालेली असताना पोलार्डच्या साथीत या नवख्या खेळाडूने भरभक्कम भागिदारी करत ५५ चेंडूत ९९ धावांची खेळी केली आणि संघाला अक्षरशः पराभवाच्या छायेतून बाहेर काढत पूर्णतः विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. या सामन्यात दोन्ही संघांची धावसंख्या सारखी झाल्याने ‘Super Over’ खेळवली गेली आणि त्यात नवदीप सैनीच्या भेदक गोलंदाजीमुळे बँगलोरने बाजी मारली.

परंतु या सामन्यानंतर किशन च्या ४ नंबर वर खेळण्याने मुंबई इंडियन्स संघाला समतोल मिळाला आहे असे नक्कीच जाणवू लागले. संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहितनेही यापुढच्या सामन्यात खेळाडूंच्या क्रमवारीत थोडाफार बदल करण्याव्यतिरिक्त कोणताही मोठा बदल केला नाही. हाच संघ पुढचे ४ सामने सलग जिंकत परिपूर्ण संघ म्हणून पुढे येत आहे आणि IPL च्या विजयाचा प्रबळ दावेदार ठरत आहे.

सलामीला रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक, तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर सुर्यकुमार यादव आणि ईशान किशन हे फलंदाज असल्याने उजवे-डावे हा समतोल राखला जातो तसेच कोणत्याही एका खेळाडूवर कामगिरीसाठी दडपण आल्याचे पाहण्यात आले नाही. ५-६-७ क्रमांकावर हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड आणि कृणाल पांड्या यांच्या क्रमवारीत सामन्याच्या परिस्थितीनुसार केवळ बदल करण्यात येतो. यासुद्धा या तिघांनीही त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करत, विविध सामन्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे. यापैकी कृणाल आणि पोलार्ड अष्टपैलू भूमिका बजावत असल्याने संघाला एक जास्त गोलंदाजीचा पर्यायही उपलब्ध होतोच!

क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या बरोबरीने गोलंदाजीलाही तितकेच महत्व आहे आणि मुंबईच्या गोलंदाजांनी ते काम अतिशय चोखपणे पार पाडलेले आहे. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅट्टीसन हे तर गोलंदाजांची क्रमवारीत पहिल्या १० मध्ये आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने राहुल चहार हा फिरकी गोलंदाज सुद्धा ७ सामन्यात ७ विकेट्स घेऊन त्यांच्या बरोबरीने विजयात हातभार लावत आहे.

या सर्व गोष्टींच्या बरोबरच रोहित शर्माने वेगवेगळ्या संघांविरुद्ध केलेल्या विविध डावपेच, गोलंदाजीत केलेले बदल आणि सुरवातीच्या मनाने क्षेत्ररक्षणाचा सुधारलेला दर्जा यामुळे नक्कीच एक विजेतेपदाचा संभाव्य दावेदार म्हणून हा संघ अंकतालिकेत सर्वोच्च स्थानी आहे. उरलेल्या सामन्यात हा संघ कशापद्धधतीने कामगिरी करतो ही गोष्ट नक्कीच पाहण्यासारखी आहे…!

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!