🕒 1 min read
मुंबई : काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमागे बिहार निवडणुकांचे कारण असल्याचे वृत्त पसरले होते. त्यामुळे बिहार निवडणुकांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून रोखणार का? यावर राजकीय क्षेत्राची नजर होती.
मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे. बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती करणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष आता वेगवेगळे लढणार आहेत.
शिवसेनेने आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. बिहार शिवसेनेच्या नेत्यांनी किमान ५० जागा पक्षातर्फे लढवण्यात याव्या या मागणीसाठी मुंबई गाठली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला, दोन्ही पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने २२ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवेसेना नेते संजय राऊत प्रचार करतील, असे सांगण्यात येत आहे.
शिवसेना स्थानिक पक्षांच्या संपर्कात!
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. बिहार निवडणूकीत कुणासोबत युती करायची याबाबतचा अद्याप निर्णय झालेला नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तर ‘बिहारचे अनेक स्थानिक पक्ष आमच्यासोबत निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे मी पुढच्या आठवड्यात पाटन्याला जाणार आहे. त्यावेळी यावर चर्चा होईल’ असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- कारशेड हलवणं हा ‘बालहट्ट’ असेल, तर ‘Axis बँके’त सरकारी खाती वळवण्याचा कोणता हट्ट म्हणायचा?
- राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 रुपयांचे नाणे जारी
- मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा राज्यपालांना अधिकार : प्रकाश आंबेडकर
- ‘ऊर्जामंत्र्यांनी इतर राज्यात लक्ष देण्याऐवजी आपल्या खात्याच्या कारभारावर लक्ष देणे गरजेचे’
- महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही; पाटील यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
