Share

कारशेड हलवणं हा ‘बालहट्ट’ असेल, तर ‘Axis बँके’त सरकारी खाती वळवण्याचा कोणता हट्ट म्हणायचा?

Published On: 

मुंबई : आरेमधलं कारशेड कांजूरमार्गला हलवणं म्हणजे बालहट्ट पुरवण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजप नेते व आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आणखीही घेतलेल्या निर्णयाचा विचार करावा, असा सल्ला आमदार प्रसाद लाड यांनी दिला आहे.

कांजूरमार्गची जी जागा आहे जिथे मेट्रोचं कारशेड तयार होणार आहे, ती जागा न्यायप्रविष्ट आहे. तिथे तिवरांची झाडे आहे. तसंच ती जागा लिटीगेशनमध्ये आहे. तिथे कारशेड कसं तयार होणार?, असा सवाल प्रसाद लाड यांनी विचारला आहे. कोरोना संकट काळात ते बाहेर पडत नाहीत, घरात बसतात, लोकांनी घरात बसावं असं त्यांना वाटतं, असा टोला लाड यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ” आरे मधलं कारशेड कांजूरमार्ग ला हलवणे म्हणजे बाल हट्ट पुरवण्याचा प्रकार आहे असे आ. प्रसाद लाड म्हणाले असं मी ऐकलंय.. मग प्रश्न असा आहे की, मागील सरकारच्या काळात पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी ॲक्सिस बँके मध्ये वळवली त्याला कोणता हट्ट म्हणायचा ??”असा खोचक प्रतिप्रश्न मिटकरींनी लाड यांना केला आहे.

कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले. तसेच आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानंतर आरेतील आदिवासी नागरिकांनी साखर वाटून स्वागत केले. तर, भाजपने यामुळं सरकारचं मोठं आर्थिक नुकसान होणार असून सुरु झालेल्या कामाला अधिक विलंब लागेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!