Share

लवासाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शरद पवारांना धक्का

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पुणे शहरापासून अवघ्या १ तासाच्या अंतरावर असणाऱ्या लवासा सिटीला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक जात असतात. लवासा प्रकल्प गेले कित्येक वर्ष वादात अडकला आहे. पर्यावरणास हानी आणि लवासा सिटीमधील काही बांधकामांची अनियमितता यामुळे लवासा सिटी प्रकल्प बऱ्याच वेळा वादात अडकला आहे. त्यातच आज माननीय मुंबई उच्च न्यायालयाने लवासा सिटी प्रकरणातील एक निकाल दिला असून त्यामुळे शरद पवार यांना धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने लवासा प्रकल्पावरील एका याचिकेचा निकाल देताना पवार कुटुंबावरील आरोपांमध्ये तथ्य असल्याचं महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाने लवासा सिटीबाबत एक महत्वपूर्ण निकाल दिला. आज दिलेल्या निकालात पवार कुटुंबियांनी लवासा प्रकल्प अजित गुलाबचंद यांना मिळावा यासाठी प्रयत्न केल्याच्या आरोपात तथ्य असल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. नाशिक मधील वकील नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबावर  लवासा सिटी प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते.

त्यांनी याचिकेत म्हटलं होतं, “शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे उद्योगपती अजित गुलाबचंद यांची लवासा कंपनी आणि प्रकल्प वाचविण्यासाठीच विरोधकांचा विरोध डावलून २००५ ची कायदा दुरूस्ती करण्यात आली. तसेच ती पूर्वलक्ष्यी प्रभावानेही  लागू करण्यात आली.” यामुळे शरद पवार यांचे निकटवर्तीय अजित गुलाबचंद यांना फायदा झाल्याचे या याचिकेत म्हणण्यात आले होते.  मुंबई उच्च न्यायालयाने यावर आपले मत नोंदवले आहे. मुंबई उच्च न्यायालय म्हणाले कि, ” लवासा प्रकल्पासाठी कायद्यात केलेली दुरुस्ती योग्य आहे. परंतु पवार कुटुंबियांनी हा प्रकल्प त्यांचे स्नेही अजित गुलाबचंद यांना मिळावा यासाठी प्रयत्न केल्याच्या आरोपांत तथ्य आहे. मात्र लवासा सिटी प्रकल्प आता पूर्ण झाला असून त्याला बराच काळ लोटला आहे असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने लवासा सिटी प्रकरणातील याचिका आज कायमची निकाली काढली.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!