🕒 1 min read
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी यासंदर्भात घोषणा केली होती. आजपासून मुंबईच्या आझाद मैदानात संभाजीराजे भोसलेंनी उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली.
यावेळी माझे राजे उपाशी असताना मी घरात कसं बसेल, अशी प्रतिक्रिया धैर्यशील माने यांनी दिली आहे. तसेच पक्षाची बंधने न बघता इथे आलेत त्यांचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे भोसले यांनी दिली आहे. तसेच या कुटुंबाने उपोषणाला बसावे लागले तो माझ्या आयुष्यातला हा काळा दिवस आहे, असं मत धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील संभाजीराजेंची भेट घेतली. प्रवीण दरेकर म्हणाले, आम्ही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. मराठा समाजाने अंतर्गत राजकारण बाजूला ठेवावे. राजकारण नव्हते तेव्हा मोठी आंदोलनं झाली. आम्हीही भूमिपुत्र आहोत. केवळ राजकारणी म्हणून आलो नाही. एकोप्याने आंदोलन करा, राजकारणाचे बळी पडू नका. येत्या अधिवेशनात आम्ही मराठा अक्षणाचा मुद्दा लावून धरु, असे आश्वासन यावेळी प्रविण दरेकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
महत्वाच्या बातम्या:
Russia-Ukraine War: रशिया -भारत संबंधांबाबतीत अमेरिकेचे मोठे विधान
‘पुढच्या अधिवेशनात आम्ही मराठा अक्षणाचा…’; प्रविण दरेकरांचे आंदोलनकर्त्यांना आश्वासन
युक्रेनच्या महिला खासदाराने उचलले शस्त्र! म्हणाल्या, “मला कधीच वाटलं नव्हतं की…”


