Share

अनेक संघर्षातून निर्माण झालेला मुंबई-गोवा महामार्ग टोल मुक्त व्हावा : राणे

Published On: 

🕒 1 min read

सावंतवाडी – अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर व अनेक संघर्षातून मुंबई-गोवा महामार्ग निर्माण होत आहे. मुंबईकर चाकरमान्यांनी यापूर्वी या रस्त्याचा खूप त्रास काढला आहे. त्यामुळे यापुढे तरी त्यांचा कोकणातील प्रवास सुकर व्हावा यासाठीच माजी मंत्री खासदार सुनील तटकरे यांनी हा महामार्ग टोल मुक्त व्हावा या केलेल्या मागणीचे भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी समर्थन केले.

कोकणातील जनतेच्या हितासाठी होत असलेल्या चांगल्या गोष्टींचे नेहमीच समर्थन राहील, असे मत यावेळी राणे यांनी व्यक्त केले. मुंबई-गोवा महामार्ग हा फारच उशिरा मार्गी लागला असून सुमारे तीनशे किलोमीटर लांबीचा महामार्ग आधीच रेंगाळला आहे. यापूर्वी या रस्त्यावर अनेकांनी खस्ता खाल्ल्या आहेत. टोल झाल्यास त्यातून काय संघर्ष उभे राहतात हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामूळेच हा महामार्ग तो मुक्त व्हावा ही आमची देखील मागणी आहे असा पुनरुच्चारही यावेळी त्यांनी केला.

सावंतवाडीतील जल्लोषी स्वागतानंतर निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, युवा नेते विशाल परब, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्षा मोहीनी मडगांवकर, सभापती सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, परिमल नाईक, आनंद नेवगी महिला नगरसेविका, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!