Share

विजय हजारे स्पर्धेत मुंबई चॅम्पियन; चौथ्यांदा चषकावर कोरले नाव

Published On: 

दिल्ली : मुंबई आणि उत्तर प्रदेश दरम्यान झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईने शानदार विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशने दिलेले ३१२ धावांचे लक्ष्य मुंबईच्या संघाने ४ गडी गमावून गाठले. मुंबईकडून आदित्य तारेने नाबाद ११८ धावांची खेळी साकारली. तर पृथ्वी शॉने ७३ धावांची खेळी साकारली. या प्रकारे मुंबईने चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.

उत्तर प्रदेशच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यचा निर्णय घेतला. माधव कौशिकच्या शतकाच्या जोरावर उत्तर प्रदेशने मुंबईसमोर ३१३ धावांचे लक्ष्य ठेवले. विजय हजारे ट्रॉफीतील ही धावसंख्या सर्वोच्च आहे. प्रत्यूत्तरात मुंबईने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत पहिल्या ९ ओव्हर्समध्ये ८९ धावा केल्या.

यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर आदित्य तारेने नाबाद शतकी खेळी करत अवघ्या ४२व्या षटकात मुंबईचा विजय खेचून आणला. यंदाच्या स्पर्धेत एकूण ४४ वेळा संघानी ३०० पेक्षा जास्त धावा केल्या. यात सर्वोच्च मुंबईची धावसंख्या ४५७/४ होती. तर सर्वोच्च वैयक्तित धावसंख्येचा विक्रमही मुंबईच्या नावे पृथ्वी शॉ (२२७) ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!