बीड: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता कमी होत असल्याचे दिसत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. कोरोनाची ही दुसरी लाट जास्तच घातक ठरत आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे म्युकरमायकोसिस आजार, यामुळे सर्वत्रच भीतीचे वातावरण पसरले आहे. म्युकरमायकोसीसचे जिल्ह्यात १४० रुग्ण आढळले आहेत.
काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या म्युकरमायकोसिस आजारांच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या रुग्णांवर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत १४० रुग्ण झाले असून २० रुग्ण बरे झाले आहेत तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, सध्या जिल्ह्यात एकमेव स्वाराती रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचाराची सुविधा आहे. बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार असून त्याचे काम सध्या सुरु आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग जोमाने कामाला लागला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्ता नसल्याने फडणवीस अस्वस्थ, सरकार स्थापनेसाठी ते तळमळत आहेत’, खडसेंची कोपरखळी
- बाहेर लोकांना उपदेश करणाऱ्या बुवाने केली पत्नीला मारहाण; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- चोराच्या उलट्या बोंबा : मी उपचारासाठी देश सोडला; पळून गेलेलो नाही – चोक्सी
- 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीला राज्यात प्रारंभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

