पंढरपूर – नैसर्गिक आपत्ती आणि चुकीच्या सरकारी धोरणांमुळे संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी आपला शेतीमाल अक्षरशः रस्त्यावर ओतून देत आहे. प्रचंड तोटा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता महावितरणच्या वसुलीचा तगादा सहन करावा लागत आहे.
राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हैराण आहे. पिके करपु लागल्याने शेतकरी हवालदिल असताना महावितरणने राज्यात वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका लावला आहे. एकीकडे पिके करपली असताना महावितरणकडुन संपुर्ण महाराष्ट्रातील डिपी सोडवले जात आहेत.
दरम्यान, ही पठाणी वसुली बंद करण्यात यावी अन्यथा महावितरणच्या कार्यालयात टोमॅटो ओतून लाल चिखल करू, व वीज कनेक्शन तोडण्यास येणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिरचीचा धुर देवू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी दिला आहे..
येणाऱ्या काळात महावितरणकडून ही मुजोरी न थांबल्यास आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात राज्यभरामध्ये शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून महावितरण व सरकारच्या मुजोरीचा बंदोबस्त करेल असेही बागल यावेळी बोलताना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राहुल गांधी हे देवाला सोडलेले वळू’, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘आगामी लोकसभा निवडणूक भाजपविरोधात एकत्रच लढवूयात!’, सोनिया गांधींचे विरोधी पक्षांना आवाहन
- ‘हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेने सत्ता मिळवत राज्यात हिटलरशाही सुरू केली’
- तहसीलदार ज्योती देवरे सुसाईड ऑडिओ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय


