Share

औरंगाबादेत महावितरणच्या ‘हर घर दस्तक’ मोहिमेस सुरुवात

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या ‘हर घर दस्तक’ मोहिमेस औरंगाबाद परिमंडलात सुरुवात झाली आहे. या मोहिमेत अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांसह महावितरणच्या विविध संवर्गातील संपूर्ण कर्मचारी सहभागी झाले आहेत. ग्राहक आपले वीजबिल भरून मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण आर्थिक अडचणीत आलेली आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले (Mangesh Gondavale) यांच्या संकल्पनेतून ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवण्यात येत आहे. ग्राहक नियमित व वेळेत वीजबिल भरत आहेत का हे पाहण्यासाठी महावितरण कर्मचारी आता घरोघरी जाऊन वीजबिल भरल्याची खात्री करत आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी वीजबिल ऑनलाईन भरण्यास अडचण आल्यास किंवा वीजबिल भरणा केंद्र जवळ नसल्यास ग्राहकाचे बिल थकीत राहू नये म्हणून महावितरणचे कर्मचारी जागेवरच वीजबिलाची रक्कम स्वीकारून महावितरणच्या ‘एम्प्लॉई मित्र’ अॅपद्वारे भरणा करून घेत आहेत.

ग्राहकांना बिल भरल्याची जागेवरच पावती दिली जात आहे. औरंगाबाद परिमंडलात सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्यासह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते तांत्रिक कर्मचारी तसेच विविध संवर्गातील संपूर्ण कार्यालयीन अधिकारी-कर्मचारीही मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुलीसाठी सरसावले आहेत. अनेक ग्राहक तातडीने बिल भरून सहकार्य करत आहेत.

जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव खंडित करण्याची कारवाई या मोहिमेत करण्यात येत आहे. तसेच थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही कुणी ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तरी वीजग्राहकांनी आपली वीजबिलांची थकबाकी व चालू बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!