Share

IPL 2022 : अश्विन फलंदाजी करताना अचानक मैदानाबाहेर गेला आणि इतिहास घडला! वाचा नक्की झालं काय!

Published On: 

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रवीचंद्रन अश्विन हा आयपीएलच्या इतिहासात रिटायर्ड आऊट होणारा पहिला खेळाडू ठरला आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात अश्विनचे ​​फलंदाजी सोडून अचानक मैदानाबाहेर जाणे, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

रविवारी राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ यांच्यात सामना झाला, या सामन्यात राजस्थानच्या डावात अश्विनने स्वत:ला रिटायर्ड आऊट केले. डावाच्या १९व्या षटकात अश्विनने हा निर्णय घेतला. सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये त्याच्या बॅटमधून मोठे फटके निघत नव्हते. तो फक्त स्ट्राइक रोटेट करत होता. त्याने फलंदाजीची सुरुवात चांगली केली होती, पण नंतर चेंडू सीमापार जाऊ शकला नाही. यामुळे अश्विनने अचानक हा निर्णय घेतला. त्याच्या जागी रियान पराग फलंदाजीला आला.

आयपीएलच्या इतिहासात रिटायर्ड आऊट होणारा अश्विन पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. अश्विनच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संघाच्या हितासाठी त्याने हा निर्णय घेतला.

राजस्थानच्या ६७ धावांमध्ये ४ विकेट पडल्या होत्या. यानंतर अश्विनने हेटमायरसोबत पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अश्विनने २३ चेंडूंचा सामना करत २८ धावा केल्या. राजस्थान संघाला २० षटकात १६५ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात लखनऊ संघ विजयापासून ३ धावा दूर राहिला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!