धुळे : धुळ्यात रामनवमीचा उत्सव मोट्या जल्लोषात पार पडला. राम नवमीच्या उत्सवानिमित्त येथे धर्मसभेचे आयोजन केले होते. त्यात विश्व हिंदू परिषेदेच्या नेत्या साध्वी सरस्वती यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या दरम्यान स्वाध्वी सरस्वती यांनी धुळेकरांना संबोधित करताना वादग्रस्त विधान केले आहे.
काश्मीर फाइल्स या चित्रपटाचा संदर्भ देत स्वादवी म्हणाल्या की, “धुळ्यात देखील दुसऱ्या काश्मीर फाइल्सची पुनरावृत्ती न होवो, या सती एक लाख रुपयाचा मोबाइल, लॅपटॉप हातात बाळगणाऱ्यांनी, एक हजार रुपयांची तलवार सुद्धा हातात घ्यावी. शस्त्र ठेवणे ही आपल्या हिंदूंची शान आहे.” असे म्हणत स्वाध्वी सरस्वती यांनी, हिंदू तरुणांना हात तलवार बाळगण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात स्वाध्वी सरस्वती यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या माहिती फलकावर ‘एकच ध्येय, एकच लक्ष्य, हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र’ असे लिहण्यात आले होते. धुळ्यातल्या या कार्यक्रमानंतर राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची दात शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक; अमित ठाकरेंची पोस्ट व्हायरल
“सोमय्या पिता-पुत्रांना जामीन देऊ नका”,मुंबई गुन्हे शाखेची मागणी
“राज नाही तर उद्धवच बाळासाहेबांचे खरे वारसदार”; रामदास आठवलेंचं मत
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “मी शेवटपर्यंत…”
INS VIKRANT घोटाळा: किरीट सोमय्या गुजरातमध्ये असल्याची माहिती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

