Share

“धोनी माझा प्रेरणास्थान” ; भारतीय महिला क्रिकेटमधील स्टार रिचा घोषचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महिला क्रिकेटच्या इतिहासात सरावात जलद अर्धशतक लागवणाऱ्या भारतीय महिला क्रिकेटच्या स्टार रिचा घोषणे महेंद्रसिंह धोनी तिचे प्रेरणास्थान असल्याचे सांगितले आहे. न्यूझीलँड विरुद्ध एकदिवसीय सामन्यात तिने केवळ २६ बॉलमध्ये अर्धशतक झळकावले होते. ज्यात तिने ४ चौकार आणि ४ सिक्सर लगावले होते.

सामन्यानंतर कर्णधार मिताली राज सोबत बोलताना रिचाने सांगितले “मी लहान असताना माझ्या वडिलांना फॉलो करायचे . मी क्रिकेटमध्ये सुरुवात केली तेव्हा मी वडिलांकडेच प्रशिक्षण घेतले. जेव्हा मी क्रिकेट बघायला सुरुवात केली तेव्हा मी धोनी आणि त्याची पॉवर हिटींग आणि तो माझा आदर्श बनला.” रिचाने न्यूझीलँड दौऱ्यात अप्रतिम कामगिरी केली आहे.

भारतीय संघाला आतापर्यंत न्यूझीलँडमध्ये खाते उघडण्यात अपयश आले असून, त्यांनी सर्व सामने गमावले आहेत. एकमेव T20I गमावल्यानंतर त्यांनी चार एकदिवसीय सामने गमावले आहेत. पाचव्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!