🕒 1 min read
मुंबई: वेस्ट इंडिजला एकदिवसीय आणि टी २० मालिकेत पराभूत करून भारतीय विजयी मनस्थितीत श्रीलंका विरुद्ध खेळण्यास उतरणार आहे. तीन सामन्यांच्या या टी २० मालिकेत श्रीलंका आणि भारतीय संघ लढण्यास आजपासून मैदानावर उतरणार आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. तसेच श्रीलंका विरुद्ध सामन्यात रोहित विराट आणि धोनीच्या यादीत समाविष्ट होऊ शकतो.
रोहित सामन्यात कोणाला खेळवायचे याचा विचार करत असेल. मात्र या सामन्यात त्याच्याकडे विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीच्या यादीत सामील होण्याची संधी आहे. जर रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20I मध्ये ६३ धावा केल्या तर हा पराक्रम करणारा तो कोहली आणि धोनीनंतरचा तिसरा भारतीय कर्णधार ठरेल. एकूणच, खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये असे करणारा तो १० वा कर्णधार ठरेल.
रोहित गुरुवारी २६व्यांदा संघाचे नेतृत्व करणार आहे आणि जर त्याने १००० धावांचा टप्पा ओलांडला तर तो बाबर आझमच्या २६ डावात १००० धावा गाठण्याची बरोबरी करेल. रोहितकडे टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा मार्टिन गप्टिलला मागे टाकण्याचीही संधी आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मालिकेत त्याने ६६ धावा केल्या होत्या आणि रोहितला श्रीलंकेविरुद्ध चांगले पुनरागमन करायचे आहे.या यादीत गप्टिलला मागे टाकण्यापासून तो फक्त ३७ धावा दूर आहे. रोहित त्याच्या नावात अजून एक विक्रम जोडू शकतो. जर आज भारत सामना जिंकला तर हा विजय भारताचा सलग १०वा T20I विजय असेल.
महत्वाच्या बातम्या
- IND vs SL: भारताची श्रीलंका विरुद्ध मालिका आजपासून सुरु होणार!
- मोठी बातमी : नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी!
- ‘विरोधकांना मलिकांच्या राजीनाम्याचा आसुरी आनंद घेऊ देणार नाही’ – छगन भुजबळ
- “…तोपर्यंत नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही”; ‘वर्षा’वरील बैठकीनंतर भुजबळांची माहिती
- नवाब मलिकांच्या अटकेनंतर मोहित कंबोज यांनी जल्लोषात नाचवली तलवार; अटक होण्याची शक्यत


