Share

#MPSC : एमपीएससी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सद्या आरक्षणाचं वातावरण पेटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असतानाच धनगर समाज देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी रस्त्यावर उतरत आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांसह खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सर्वच प्रकारच्या भरती परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली होती. मात्र, परीक्षा होणार की नाही याबाबत चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज आपली भूमिका जाहीर केली आहे.

पूर्व परीक्षा ठरलेल्या तारखेला म्हणजे 11 ऑक्टोबरलाच होणार असल्याचं आयोगाने आज जाहीर केलं. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसारच ही परीक्षा होणार असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. परीक्षा आणि भरती दोन्ही शासनाच्या निर्णयानुसार होणार आहेत असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे.

मराठा समाजाचा आक्रमक इशारा

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुणांचे मोठे नुकसान होत असल्याचे आबा पाटील यांनी संगीतलं. तसंच, एमपीएससी परीक्षांचं करण्यात आलेलं आयोजन त्वरित थांबवून मराठा आरक्षण स्थगिती उठेपर्यंत या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अन्यथा आक्रोशाला समोरं जावं लागेल असे मराठा संघटनांनी ठणकावले होते.

तर परीक्षा केंद्रच फोडू!

मराठा आरक्षणाला स्थगिती असतानाही एमपीएससी परीक्षा घेण्याचा घाट कोण घालत आहे? त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. ही परीक्षा तात्काळ पुढे ढकलण्यात यावी, अन्यथा एमपीएससीचे परीक्षा केंद्र फोडण्यात येईल, असा इशारा देखील मराठा संघटनेच्या आबा पाटील यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!