ठाणे- ठाण्यातील अनंत करमुसे या सिव्हिल इंजिनियरने आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या 15 ते 20 समर्थकांनी त्यांना जबर मारहाण केली होती. या प्रकरणी सहा महिने उलटल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी या मारहाण प्रकरणात सहभागी असलेल्या तिघा अंगरक्षक पोलिसांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार,घोडबंदर रोडवरील आनंदनगर भागात राहणारे करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली होती. या पोस्टनंतर ५ एप्रिल रोजी रात्री करमुसे यांना पोलीस आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेले आणि १५ ते २० जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता.
ठाण्यातील सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना मारहाण प्रकरणात तिघा पोलिस शिपायांवर अटकेची कारवाई झाली.श्री.करमुसे यांच्याशी पोलिसांचा काहीही वाद नव्हता.त्यामुळे आता या प्रकरणातील मुख्य सुत्रधारावर कारवाई कधी होणार?@CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @DGPMaharashtra @ThaneCityPolice
— Niranjan Davkhare (@niranjandtweets) October 5, 2020
विशेष म्हणजे मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित होते असा करमुसे यांच्या तक्रारीत उल्लेख आहे. दरम्यान, ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाणप्रकरणात तिघा पोलिस शिपायांवर कारवाई झाली असली, तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का, असा सवाल भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- धक्कादायक! राजेश टोपे यांच्या बैठकीत शेतकऱ्याने केले विष प्राशन
- अनंत करमुसे मारहाण प्रकरणात सहा महिने उलटल्यानंतर अखेर तीन पोलिसांना अटक
- कोरोना बाधीत मनपा शिक्षकांसाठी बेड आरक्षीत ठेवा : महापौर
- ‘दानवे किती रस्त्यावर असतात हे सर्वांना माहित आहे’ ; बाळासाहेब थोरातांचं प्रत्युत्तर
- ‘आम्ही आमच्या रक्ताचे दान देतोय, आतातरी आम्हाला आरक्षण द्या’


