🕒 1 min read
पुणे :कोरोनाने राज्यात हाहाकार माजविला असल्याचे चित्र आहे.या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत महाविद्यालयांकडून शिकवला जाणारा ऑनलाइन अभ्यासक्रम ग्राह्य धरला जाणार असून त्या आधारेच परीक्षा घेतल्या जातील. मात्र ,कोरोना परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू होतील, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तर्फे घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन ऑफलाईन परीक्षांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने , विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे आदी उपस्थित होते.
सामंत यावेळी म्हणाले की, राज्यातील अनेक गोष्टी हळूहळू सुरू झाल्या आहेत. आता काही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफ़लाईन घेतल्या जाणार आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याचे त्यामध्ये नुकसान होणार नाही. याबाबत विशेष काळजी घेतली जाणार आहे. ऑफ़लाईन परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्याची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान,पुण्यात एकूण अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. तर ५० हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत. अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. त्या सेंटरवार सॅनिटायझेशन केलं जाईल. ग्रामीण भागात ही जबाबदारी जिल्हा परिषदेवर असेल. तर शहरी भागात ही जबाबदारी महापालिकेवर असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का?
- मास्क न लावणा-या १०१०५ बेजबाबदार नागरिकांविरोधात मोठी कारवाई
- ‘राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार’
- अनंत करमुसे मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का?
- कोकणातील प्रकल्पावरून कॉंग्रेस-शिवसेना आमने-सामने ; महाविकास आघाडीत रंगला कलगीतुरा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
