🕒 1 min read
मुंबई- देशभरात अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांवर अनेक गंभीर आरोप देखील झाले. मात्र सुशांतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा एम्सचा अहवाल समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची जाणीवपूर्वक बदमानी केली जात असल्याचं वारंवार राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात येत होते ज्याला एम्सच्या अहवालाने बळ मिळाले आहे.
दरम्यान, बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या राज्याचे भाजपचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील रणनीती ठरविण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. तसेच, बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला आणि भाजपप्रणित आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळविण्यासाठी फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.
महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?, असा थेट सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला.
सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले. महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे काम भाजपने केले आहे. महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात, ते फारच दुःखद आहेत. भाजपने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, नाहीतर जनता त्यांना माफ करणार नाही, अशी टीका अनिल देशमुख यांनी भाजपवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- नागपूर : स्मार्ट सिटीच्या कॅमे-यांच्या माध्यमाने गुन्हेगारांना पकडण्यात यश
- मास्क न लावणा-या १०१०५ बेजबाबदार नागरिकांविरोधात मोठी कारवाई
- ‘राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार’
- अनंत करमुसे मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का?
- कोकणातील प्रकल्पावरून कॉंग्रेस-शिवसेना आमने-सामने ; महाविकास आघाडीत रंगला कलगीतुरा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
