पुणे- मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. पंजाबामध्ये काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली खेती बचाओ यात्रा सोमवारी संगरूर जिल्ह्यात पोहोचली.
भवानीगड येथे धान्यबाजारात झालेल्या सभेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कृषि विधेयकाकरून मोदी सरकारवर निशाणा साधला.मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारांनी सहा वर्षांच्या कार्यकाळात गरीब, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी एकही धोरण आणले नाही. ती सर्व धोरणे तीन ते चार निवडक मित्रांसाठी (उद्योगपती) बनवण्यात आली, असे त्यांनी म्हटले.
राहुल गांधी या यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारवर हल्ला चढवत आहेत तर भाजपनेते हे कायदे कसे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत हे सांगत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत या कायद्यांची उपयुक्तता सांगितली. दानवे म्हणाले, सहा वर्षांपासून काँग्रेस आणि मित्र पक्षांना लोकांसमोर जाण्यासाठी कुठलाच मुद्दा नव्हता. आपली मलिन प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे असं म्हणत दानवे यांनी कॉंग्रेसला टोला लगावला.
मोदी आणि तोमर यांनी लोकसभेत शेतकऱ्यांचा माल किमान किमतीला खरेदी करण्यात येईल असे जाहीर केले आहे. असे असताना काँग्रेसने पंजाब हरयाणामध्ये आंदोलन करत आहे. काँग्रेसने मिनिमम सपोर्ट प्राईस ने खरेदीचा उल्लेख विधेयकमध्ये करा असं म्हणतंय, परंतु काँग्रसने देखील तसे केले नव्हते. मिनिमम सपोर्ट प्राईस हे मोदी सरकारचे धोरण आहे असं दानवे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-
- महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का?
- मास्क न लावणा-या १०१०५ बेजबाबदार नागरिकांविरोधात मोठी कारवाई
- ‘राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार’
- अनंत करमुसे मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का?
- … तोपर्यंत राज्यातील कॉलेजेस सुरु होणार नाहीत – उदय सामंत


