🕒 1 min read
पुणे : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे विधान परिषेदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पुण्यात आंदोलन सुरु केले. त्यानंतर थोड्याच वेळात याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडण्यास सुरुवात झाली होती.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज जनतेला संबोधन करत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले कि MPSC परीक्षेची तारीख कोणत्याही परीस्थित उद्याच जाहीर होईल. तसेच तशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिलेल्या आहेत. उद्या जाहीर करण्यात येणारी तारीख ही पुढच्या आठ दिवसातीलच आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.
परंतु त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर विद्यार्थ्यांसह पडळकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती . गोपीचंद पडळकर यांनी दुपारी सुरु झालेले केलेले आंदोलन हे आता असेच सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना आता सांगितले होते.
परंतु आता पोलिसांनी बळाचा वापर करून विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळा वरून पांगवण्यात आले. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह राम सातपुते यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. तसेच आंदोलनस्थळी वार्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधीची गळचेपी करण्यात आलेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : MPSCची तारीख उद्या जाहीर होणार; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
