पुणे : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे विधान परिषेदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पुण्यात आंदोलन सुरु केले.
पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, नाशिक,अहमदनगर येथे विध्यार्थ्यांच जोरदार आंदोलन चालू आहे. MPSC चे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुणे शहरातील नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज जनतेला संबोधन करत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले कि MPSC परीक्षेची तारीख कोणत्याही परीस्थित उद्याच जाहीर होईल. तसेच तशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिलेल्या आहेत. उद्या जाहीर करण्यात येणारी तारीख ही पुढच्या आठ दिवसातीलच आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.
एमपीएससीची परीक्षी पुढे ढकलल्याने राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तर रद्द केलेली पूर्व परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी सर्वस्तरातून केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तातून आलेली गीता परभणीत घेते शिक्षण
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?


