मुंबई : १४ मार्च रोजी होणारी MPSC परीक्षा २१ मार्च रोजी होणार आहे. तर, उर्वरित राज्य सेवा पूर्व परीक्षा या नियोजित तारखांनुसारच होणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलं आहे. दरम्यान, या परीक्षांकरता मानक कार्यप्रणाली म्हणजेच एसओपी जारी करण्यात आली आहे.
ही नियमावली आयोगाने उमेदवारांना कळवली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा ही अत्यंत सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आयोगाने कडक नियम तयार केले आहेत. ज्याचे काटेकोरपणे पालन करणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे.
परीक्षार्थी उमेदवारांना कोव्हिड किट मिळणार असून ट्रिपल लेअर मास्क परिधान करणे बंधनकारक असणार आहे. शिवाय कोव्हिड सदृश्य लक्षणं असणाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष देखील असणार आहे. या परिक्षार्थींना कोव्हिड किट देखील बंधनकारक असणार आहे. परीक्षा संपल्यानंतर गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
जाणून घ्या नियमावली –
- परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करताना किमान तीन पदरी कापडाचा मास्क अनिवार्य
- परीक्षा कक्षात मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझरचा पाऊच असणारे एक किट उपलब्ध करून दिले जाईल. दोन्ही सत्रासाठी याचा वापर करणं अनिवार्य
- परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता आणि आरोग्यास हितावह वातावरण राखण्यास हात सतत सॅनिटाइझ करणं आवश्यक
- कोव्हिड सदृश्य लक्षणं असणाऱ्या परीक्षार्थींची परीक्षा वेगळ्या कक्षात होईल. त्यांना मिळणाऱ्या पीपीई किटमध्ये मास्क, हातमोजे, फेस शील्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप असेल.
- परीक्षा केंद्रावरील माहिती फलक, सांकेतिक चिन्हं, भित्तीपत्रिका इ. सूचनांचा वापर सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यासाठी करावा
- परीक्षा संपल्यावर सोशल डिस्टंन्सिंग पाळणं अनिवार्य
- वापरलेले टिशू पेपर, मास्क, हातमोजे, सॅनिटाइझ पाऊच परीक्षा केंद्रावरील आच्छादित कुंडीत टाकावे
- कोव्हिडबाबते केंद्र आणि राज्याकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे
महत्वाच्या बातम्या
- मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशांची उधळण ही तर मोगलशाही, बावनकुळे यांचा नितीन राऊतांवर प्रहार
- विमाक्षेत्रात एफडीआयचे प्रमाण ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के इतके वाढवले
- धक्कादायक! बसमध्ये ८१ प्रवासी; जिंतूर येथील एस.टी. आगारात कोरोना नियम धाब्यावर
- यांच्यावर कारवाई होणार का? कोरोना तपासणी करणारे कर्मचारीच मास्कविना
- महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, मध्यप्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय…


