परभणी: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे मात्र नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसत नाहीये. मास्क व सॅनिटायझरचा वापर सुद्धा कमी झालेला दिसतोय तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडालेला आहे. यामुळे कोरोना नियंत्रणात येण्या ऐवजी तो वाढतच चालला आहे आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर येथे गुरुवारी एसटी बसमध्ये तब्बल ८१ प्रवासी प्रवास करत असल्याचे दिसून आले. या प्रवाश्यांमध्ये तर अनेकांनी मास्क सुद्धा लावलेला नव्हता तसेच फिजिकल डिस्टन्सिंग तर कुठेच पाळलेले दिसत नव्हते. या प्रकारामुळे जिंतूर आगाराला १ लाखांचा दंड लावण्यात आला आहे.
जिंतूर येथे गुरुवारी सेलूचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी तसेच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथक विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत होते. या वेळी जिंतूर-लातूर या बसमध्ये (एमएच २० बीएल १९२२) तब्बल ८१ जण प्रवास करत असल्याचे आढळले. बसमध्ये काही प्रवाशांनी मास्कही लावलेला नव्हता. तसेच बसमध्ये एक कुत्र्याचे पिल्लू सुद्धा सापडले. या निष्काळजीपणाचा चांगलाच दंड जिंतूर आगाराला लावण्यात आला आहे.
जिंतूर आगाराला लावण्यात आलेल्या दंडाची रक्कम सोमवारपर्यंत भरायची आहे. दंड न भरल्यास आगारप्रमुखांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पारधी यांनी सांगितले आहे. कोरोना काळात लॉकडाऊननंतर प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली. परंतु यादरम्यान प्रवाशांकडून कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री रावत यांच्या वक्तव्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा देखील देशातील सर्व न्यायाधीशांना सल्ला
- दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार विद्यार्थ्यांनी तयारी करावी…
- ‘अरे देवा, यांचे गुडघे दिसत आहेत की’; प्रियांका गांधींची तीरथ सिंह रावतवर टीका
- वीरेंद्र सेहवागचे असेही एक टि्वट; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा वापरला फोटो
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर


