बीड: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील व्यापाऱ्यांना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. १५ मार्चपर्यंत जर व्यापाऱ्यांनी टेस्ट केली नाही तर त्यांची दुकाने सील करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसील कार्यालयाने दिला होता.
मात्र तपासणी करणारे कर्मचारीच नियम पाळत नसल्याचे दिसून आले. काही कर्मचार्यांच्या तोंडाला मास्क नव्हता आणि तरी हे तपासणी करत होते. मास्क न वापरता यांना तपासणीचा अधिकार कोणी दिला, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत, तसेच कर्मचारीच मास्क वापरत नसल्याने सामान्य नागरिकांनी त्यांचा काय आदर्श घ्यायचा, अशी चर्चा सध्या व्यापार्यांमध्ये होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धारूर शहरामधील सर्व व्यापाऱ्यांना अँटिजन टेस्ट करणे बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. १५ मार्चनंतर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. यासाठी येथील महसूल, नगर परिषद, पोलिस प्रशासनाची चार पथके तयार करण्यात आली आहे. ज्या व्यापार्यांनी टेस्ट केली नसेल त्यांची दुकाने सील करून आपत्ती व्यवस्थापनांतर्गत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही तहसील प्रशासनाने आदेशामध्ये दिला होता. ज्या दुकानदारांनी कोरोना तपासणी केली नाही त्यांना तपासणी करून घेण्याच्या सूचनाही देण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- साराअली खान आणि श्रद्धा कपूरच्या मेकअप आर्टिस्टमध्ये जुंपली
- ‘ते दोन अधिकारी खरं बोलले तर आर्थर रोड जेल हे नवीन मातोश्री होऊ शकतं’
- मुंबई पोलीस दलात कोणत्याही विभागात विशेष पथक नसेल, पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंचा पहिला निर्णय
- कंगनाचा ‘थलायवी’ चित्रपट ‘या’ खास दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- उन्हाळा लक्षात घेऊन नागरिकांना लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा द्या – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
