Share

मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशांची उधळण ही तर मोगलशाही, बावनकुळे यांचा नितीन राऊतांवर प्रहार

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : थकीत वीज बिलापोटी महावितरणकडून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात असताना शेतकरी अडचणीत सापडत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी अशी मागणी सर्वसामन्यांकडून केली जात आहे. तरी देखील महावितरण विभाग तोट्यामध्ये असल्याचे सांगून अनेकांची वीज सरकारकडून तोडण्यात येत आहे.

परंतु दुसरीकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करून सरकार पैशाची उधळपट्टी करत असल्याचे आरोप भाजपने केले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं सरकारी निवासस्थान आणि कार्यालयाच्या पुनर्बांधणीवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. अतिशय एशो-आरामाचा माहोल त्या ठिकाणी बंगल्यामध्ये करण्याचे काम सरकारकडून करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

यावरून माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयांवर दुरुस्तीच्या नावाखाली करण्यात आलेल्या खर्चावर टीका केली आहे. नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी नितीन राऊत यांचा खरपूस संचार घेतला आहे. मंत्र्यांनी बंगले आणि कार्यालयांवर केलेला खर्च योग्य नाही. त्यांनी कार्पोरेट ऑफिस तयार केले. सुमारे 100 ते 150 कोटी रुपये बंगल्यांवर खर्च करण्यात आले. हा खर्च अनाठायी होता. शेतकऱ्यांना सरकार पैसे देत नाही. वीज बिल माफ करत नाही. कोरोनाचं संकट आहे आणि मंत्री बंगल्यांवर खर्च करत आहेत. हे काय चाललंय? ही मोगलशाही आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

पहा चंद्रशेखर बावनकुळे यांची संपूर्ण पत्रकार परिषद 

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/424842185282089

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!