Share

Alia Bhatt | आई झाल्यानंतर ‘आलिया’ने केला पहिला फोटो शेअर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt 0)आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नुकतेच पालक झाले आहेत. आलियाने एका गोंडस लक्ष्मीला म्हणजेच एका मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर आलिया आणि बाळाची तब्येत एकदम उत्तम आहे. त्याचबरोबर आलिया आई झाल्यापासून तिचे चाहते तिची आणि तिच्या मुलीची झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहे. अशा परिस्थितीत आलिया भटने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर नुकतीच एक पोस्ट केली आहे. तिच्या या नव्या पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत असून, चाहते  तिच्या बाळाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

आलिया भटने इंस्टाग्रामवर तिचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. आलियाने शेअर केलेला हा फोटो अस्पष्ट आहे. ज्यामध्ये आलियाच्या हातातील कॉफी मग फोकसमध्ये आहे, तर आलियाने चित्र अस्पष्ट आहे. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आलियाच्या या लाल रंगाच्या कपावर पांढऱ्या अक्षरांमध्ये मम्मा (mama) असे लिहिले आहे. आलियाच्या अस्पष्ट फोटोमध्ये तिने लाल रंगाचा सैल टी-शर्ट परिधान केलेला आहे.

आलिया भटने आई झाल्यानंतर तिचा इंस्टाग्रामवर पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे की, ” इट्स मी (It’s me).” दरम्यान आलिया भटने ती आई झाल्याची माहिती तिच्या शेवटच्या पोस्टवरून दिली होती. आलियाने एक सुंदर नोट लिहून चाहत्यांसोबत आपली आई झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती.

तर, दुसरीकडे आलियाने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहे. एवढेच नाही तर आलियाच्या या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये आलियाचे चाहते बाळाचा चेहरा आणि नाव सांगण्याची मागणी करत आहे. आलिया भटच्या या पोस्टला आत्तापर्यंत हजारो लाईक मिळाले असून त्यावर कमेंट्सची बरसात होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!