Share

सुजय विखे तोडणार अहमदनगर महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादी युती, शिवसेनेला सत्तेत वाटा ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या राजकीय हालचालींना सुरवात झाली आहे. त्याची सुरवात कॉंग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे यांच्या भाजपवासी होण्यापासून झाली असून आता नगरचे नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांनी अहमदनगर महिपालीकेतील राज्यभर गाजलेली भाजप-राष्ट्रवादी युती तोडून शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेलाही सत्तेपासून दूर रहावं लागलं. पण भाजप आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारुन शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची चिन्हं दिसत आहेत. नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी याबाबत संकेत दिले आहेत.

निवडणुकीनंतर महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला. पण, लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीने ताकद लावली. लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवासाठी राष्ट्रवादीने जोरदार प्रयत्न केले होते, असं खासदार विखे-पाटील यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादी ही आघाडी आता संपुष्टात येणार असल्याचं स्पष्ट झालंय.

महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक 24 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर तर, भाजप 14 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. पण, भाजपने 18 जागा असणाऱ्या राष्ट्रवादीच्या जोरावर सत्ता स्थापन केली. नगरमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाचा फायदा भाजपला झाला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!