पंढरपूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे.
आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून १५ एप्रिल रोजी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय नेत्यांमध्ये जुंपल्याच दिसून आलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खंडणी वसुलीच्या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. सीबीआय चौकशीमुळे अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा कारभार सोपवला आहे.
याचवरून गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलं आहे. ‘राष्ट्रवादी खूप हुशार आहे. बघतानाच गरीब घरचा गृहमंत्री बघतात. साहजिक चिल्लर त्याला आणि नोटा बारामतीला,’ असा टोला त्यांनी लगावला आहे. यासोबतच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील पडळकरांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. ‘ज्यांनी राज्यात घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरू आहेत. नियतीचा न्याय इथेच पाहायला मिळतो.’ असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
- नागरिकांशी संवेदनशीलपणे वागा; गृहमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना
- विनाकारण फिरणाऱ्या लोकांना अगोदर सूचना द्या, मग कठोर कारवाईला सुरुवात करा – देसाई
- प्रतिष्ठा आणि पैसा’ ; मॉरिसच्या खेळीवर सेहवागचं हटके ट्विट
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज देऊन मदत करा; वडेट्टीवारांच मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

