बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. येत्या १७ एप्रिलला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ही लढत तिरंगी झाल्याचं आता दिसून येत आहे. भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, काँग्रेस कडून आमदार सतीश जारकीहोळी, तर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शुभम शेळके उभे राहिले आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेंना शिवसेनेनं आपला पाठींबा दिला आहे. इतकंच नाही तर १४ एप्रिल रोजी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे शेळकेंच्या प्रचारासाठी बेळगावात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यानंतर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील बेळगावात सभा पार पडली असून त्यांनी संजय राऊतांसह शिवसेनेला लक्ष्य केलं.
‘आता महाराष्ट्रात शिवसेना उर्दूत कॅलेंडर छापतेय. त्या कॅलेंडरमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव छापत आहे. म्हणून या कर्नाटकात जी काँग्रेस टीपू सुलतान जयंती साजरी करते त्यांना निवडून देण्याकरता शिवसेना नेते इथे आले. बाळासाहेबांची शिवसेना आता राहिलेली नाही. काँग्रेसच्या सोबत राहून शिवसेनेने अजाण स्पर्धा घेतली. मात्र आम्ही छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत शिवगाण स्पर्धा घेतली’ अशा शब्दांत त्यांनी प्रहार केला आहे.
आता फडणवीसांच्या या टीकेचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘सीमा लढ्यात 67 हुतात्मे आम्ही दिले. बाळासाहेब ठाकरेंना तीन वर्षाचा कठोर तुरुंगवास झाला. त्यामुळे सीमावासीय आणि मराठी याबद्दलच प्रेम आम्हाला शिकवण्याची गरज नाही, आम्हाला कुणी ज्ञानामृत पाजू नये. तुमचं मराठी प्रेम दिसून आलं आहे’, असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- विनाकारण फिरणाऱ्या लोकांना अगोदर सूचना द्या, मग कठोर कारवाईला सुरुवात करा – देसाई
- लांब पल्ल्याच्या फेऱ्या थांबल्या; उमरगा आगर नुकसानीत
- ‘प्रतिष्ठा आणि पैसा’ ; मॉरिसच्या खेळीवर सेहवागचं हटके ट्विट
- ‘माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार !’
- संचारबंदीचा नियम मोडणार्यांवर कडक कारवाई करा; गृहमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश


