Share

खासदार संजय जाधव यांच्याकडून कोरोना रुग्णांसह कुटूंबियांसाठी मदत केंद्र सुरू

Published On: 

परभणी : कोरोनाबाधित रुग्णांसह कुटूंबियांना या आपत्ती काळात अॅडमीटसह तपासणी, औषधोपचार, भोजनासह इतर अडचणी तसेच समस्या दुर करणे तसेच मदतीकरिता शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी शुक्रवारी शिवसेना मदत केंद्र (कोविड – 19) हे सुरू केले आहे.

या केंद्राचे उद्घान दीपक मुगळीकर यांच्या हस्ते शुक्रवारी वसमत रस्त्यावरील संपर्क कार्यालयात या मदत केंद्राचे उद्घाटन केले. उद्घाटनप्रसंगी संजय जाधव म्हणाले की, या शिवसेना मदत केंद्र कोव्हिड १९ या केंद्राव्दारे शहरासह व ग्रामीण भागामधील कोरोनाबाधित रुग्णांना, त्यांच्या कुटूंबियांना योग्य ते मार्गदर्शन या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ त्यांच्या अडीअडचणी तसेच अन्य समस्यासुध्दा देखील सोडण्यासाठी मदत करणार आहोत, असा विश्वास या वेळी खासदार संजय जाधव यांनी या वेळी व्यक्त केला.

परभणी शहरासह ग्रामीण भागात कोराेना रुग्णांचा आकडा खुप मोठया प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सर्व कोरोनाचे रुग्णालये देखील फुल्ल झाले आहेत. तर बेड तसेच औषधोपचार करणारे डॉक्टर्स देखील देखभाल करण्यासाठी खुप प्रयत्न करत आहेत. परंतू रुग्णांच्या तुलनेत सर्व आरोग्य यंत्रणा देखील तोकडी पडत आहे. त्यामुळे सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमधुन शिवसेनेचे शिवसैनिक मदतीसाठी सदैव तत्पर राहणार आहेत. ज्या कोणाला तो रुग्ण असो अथवा नातेवाईक तसेच संबंधितांनी या स्वयंसेवकांशी संपर्क करण्याचे आवाहन या वेळी खासदार जाधव यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!